Crime News, khed SaamTv
महाराष्ट्र

Kokan News : कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, महिन्यापुर्वी घनदाट जंगलात घडली खूनाची घटना

खेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Ratnagiri Crime News : माणगाव येथील लाकुडतोड्याचा (Lakud Todya) खेडमध्ये खून झाला. दोघांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड (khed) मधील आंबवली - वरवली येथील जंगलात (jungle) ही घटना घडली. एक महिन्याने कुजलेल्या अवस्थेत लाकूडताेड्याचा मृतदेह सापडला असून या प्रकरणी पाेलिसांनी (police) खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (ratnagiri latest marathi news)

रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील खेड तालुक्यात जंगलतोडीसाठी माणगाव येथून आलेल्या एका लाकुडतोड्याचा त्याच्याच एका सहकाऱ्याने खून केल्याचे पाेलिसांनी उघडकीस आणले आहे. त्या लाकुडतोड्याचा मृतदेह तब्बल एक महिन्यानंतर आंबवली - वरवली गावच्या दरम्यान असणाऱ्या घनदाट जंगलात अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत आढळला.

या प्रकरणी खून करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्या विरोधात खेड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आंबवली - वरवली या दोन गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात जंगलतोडीसाठी रायगड (raigad) जिल्ह्यातल्या माणगाव येथून लाकुडतोड करणारे कामगार खासगी जंगलतोड करणाऱ्या कंत्राटदाराने मागवले होते.

२६ डिसेंबरला नेहमी प्रमाणे जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघा जणांमध्ये वाद झाला. त्यापैकी मंगेश गायकवाड या कामगाराचा मारहाणीत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दुर्गम जंगलात टाकण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत या कामगाराचा मृतदेह आढळल्यानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात मंगेश गायकवाड या लाकुडतोड्याचा मारहाण करून खून केल्या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञात कामगारावर (भा.दं. वि. कलम ३०२ नुसार) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित खुन्याला पकडण्यासाठी खेड पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT