Khed Bus Driver Beaten SAAM TV
महाराष्ट्र

Khed News: बस चालकासह प्रवासी महिलेला तरुणांकडून बेदम मारहाण! खेडमधील धक्कादायक प्रकार

Khed Bus Driver Beaten: साबुर्डीहून राजगुरुनगर येथे बस जात असताना दुचाकीस्वार तरुणांनी बस चालकाला दमदाटी करत मारहाण केली.

Chandrakant Jagtap

>> रोहिदास गाडगे, साम टीव्ही

woman and bus driver brutally beaten by youths : खेडमध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेसह बस चालकाला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खेड तालुक्यातील कडुस गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी साबुर्डीहून राजगुरुनगर येथे बस जात असताना दुचाकीस्वार तरुणांनी बस चालकाला दमदाटी करत मारहाण केली. एवढच नाही तर बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेलाही तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

दुचाकीस्वार तरुणांच्या या मारहाणीत बस चालक आणि प्रवासी महिला जखमी झाले आहेत. राजेंद्र कांबळे बसचालकाचं नाव असून उषा शिंदे असं जखमी प्रवासी महिलेचं नाव आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यावरच घडली. (Latest Political News)

दुचाकीस्वार तरुणांनी घातलेला हा राडा कँमेरात कैद झाला आहे. बस चालक आणि प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलीसांत दुचाकीस्वार तरुणांविरोधात जबरी मारहाण करुन शासकीय कामात आडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT