Hingoli saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोली शहरात येणारा महामार्ग पुढील दोन महिन्यांसाठी वाहतुकीस बंद

आता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे ब्रिज पुढील दोन महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. वाहनधारकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. (Hingoli Latest Marathi News)

हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे ब्रिजचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. आता या ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रेल्वे क्रॉसिंग गेटवर या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करावयाचा असल्याने कंत्राटदाराने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरुपात केली हाेती. (Maharashtra News)

हे काम लवकर पुर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे ब्रिज आजपासून पुढील दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. दरम्यान वाहतुकीसाठी वाहनधारकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. वाहनधारकांनी (citizens) शिस्तीचे पालन करावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT