khamgaons 4 arrested in fake currency near buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News : बुलढाण्यात पाेलिसांची माेठी कामगिरी, बनावट नोटांसह चार अटकेत; 14 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारमधील चारही जण फसवणुकीच्या उद्देशाने निघालेचे निष्पन्न झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

संजय जाधव

Buldhana Fake Currency News :

बुलढाणा जिल्ह्यात बनावट चलनी नोटासह 14 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही जण खामगाव (khamgaon) येथील असल्याची माहिती पाेलिसांनी देण्यात आले. (Maharashtra News)

बनावट नाेटा प्रकरणाची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली हाेती. या गुप्त माहितीनूसार खामगाव अकोला रोडवरील टेम्भूर्णी गावाजवळ पाेलिसांनी नाकाबंदी केली. या मार्गावर एक कार येताना पाेलिसांना दिसली. त्या कारला थांबवून पोलिसांनी कारची झडती घेतली.

त्यात चिल्ड्रेन बँकेच्या 6100 रुप्याचे 61 बंडल आढळून आले. प्रत्येक बंडल वर व खाली एक 500 रुपयांची खरी नोट चिकटवलेली होती. तसेच सहा मोबाईल, सेलोटेप, कैची, कारला बनावट नंबर प्लेट मिळून आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी एकूण 14 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारमधील चारही जण फसवणुकीच्या उद्देशाने निघालेचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

SCROLL FOR NEXT