khamgaon police arrests five in theft case near buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana : जालना, बीड जिल्ह्यातील पाच युवकांना अटक, खामगाव पाेलिस दरोडेखोर-यांच्या म्होरक्यासह चाैघांचा मागावर

बुलढाणा पाेलिस दलाने चाेरट्यांच्या टाेळीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथक रवाना केली हाेती. विविध ठिकाणच्या चाेरीच्या तपासात खामगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी (buldhana police) नुकतीच माेठी कामगिरी बजावली आहे. पाेलिसांनी पाच अट्टल दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 105 ग्रॅम सोने, 264 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यात चाेरी करणारी टाेळीच्या मुख्य सूत्रधाराच्या मागावर बुलढाणा पोलिस असून आणखी चाैघांचा शाेध सुरु असल्याचे पाेलिसांनी नमूद केले. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी करून ऐवज लुटणाच्या प्रकारात माेठ्या संख्येने वाढ झाली हाेती. यामुळे बुलढाण पाेलिस दलाने चाेरट्यांच्या टाेळीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथक रवाना केली हाेती. विविध ठिकाणच्या चाेरीच्या तपासात खामगाव पोलिसांनी पाच अट्टल गुन्हेगारांना अटक केली. हे पाचही आरोपी जालना आणि बीड जिल्ह्यातील आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार घरफोडी करताना आराेपी आधी घराची रेकी करायचे. त्यांनतर घरफोडी करायचे. या पाचही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत त्यांची सखाेल चाैकशी केली. त्यानंतर त्यांना विविध गुन्ह्यांत अटक केली आहे. या आरोपींचे आणखी 4 साथीदार आहेत. त्यांना व टोळीतील मुख्य सूत्रधारास लवकरच अटक करु असा पाेलिसांनी विश्वास व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT