Nashik Train Accident Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Train Accident: इगतपुरीकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली, कसारा-नाशिक वाहतूक ठप्प

Nashik Train Accident: इगतपुरीतून मोठी बातमी हाती आली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कसाराहून इगतपुरी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.

Sandeep Gawade

फैयाज शेख

Nashik Train Accident

इगतपुरीतून मोठी बातमी हाती आली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे कसारा-इगतपुरी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारे प्रवाशी अडकून पडले आहेत.

कसाराहून इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरले असून कसाराहून इगतपुरी व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही मालगाडी कल्याणहून कसारामार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना 500 मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली आहे. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान नाशिककडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वे मार्गावरून घसरलेले डबे हटवण्याचं काम रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र यासाठी किती वेळ लागेल हे सांगण्याची शक्यता कमी असल्यामुळे या मार्गावरील वाहतून अन्य मार्गाने वळवण्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

‘तुतारीचा बादशहा’ हरपला; सोशल मीडियावर भावुक रीलमधून आठवणींना उजाळा

Pune Rain : कडक उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं, वादळी वारा, रस्त्यावर पाणी, वरून टपोऱ्या गारांचा तडाखा

Maharashtra Live News Update: भर पावसात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे विविध समस्यांबाबत आंदोलन

Ashok Kharat: मंत्रालयातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बायका अशोक खरातकडे जायच्या, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT