करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी Saam Tv
महाराष्ट्र

करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दाखल झालेल्या गुन्हयात अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विनोद जिरे

बीड: प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दाखल झालेल्या गुन्हयात अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. रविवारी त्यांच्यावर परळीतील एका व्यक्तीवर चाकु हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात आता अंबाजोगाई न्यायालयाने शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर सोबत असणाऱ्या अरुण मोरे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. परळी पोलिसांकडून करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयातून, मोठ्या बंदोबस्तात बीडच्या दिशेने आणण्यात येत आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी होणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे फेसबुक लाइव्द्वारे जाहीर केले होते. तसेच या सर्व बाबी आपण परळीत (Parali) येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे सांगितले होते. आपल्याला जिवंत जाळण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्या तरीही, पत्रकार परिषद घेणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे बीडसह (Beed) संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर करुणा मुंडे या दुपारी परळीत दाखल झाल्या त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना काही महिलांकडून धक्काबुक्की झाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र पोलीस ठाण्याबाहेर महिलांसह धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी प्रचंड गर्दी करत, करुणा मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आमच्या साहेबांना बदनाम करायला परळीत आलाय का? असा सवाल करत धनंजय मुंडे समर्थक महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला व घेराव घातला. यावेळी करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यामुळे करुणा मुंडे ज्या गाडीने आल्या होत्या, त्या इनोव्हा क्र.एम. एच.04, एच.एन. 3902 या गाडीची पोलिसांनी तपासणी केली आणि त्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आला होता, त्यानंतर सर्व नाट्य सुरु झालं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Underarms Care Tips: अंडरआर्म्सचा काळेपणा आणि दुर्गंधी दूर करायची? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ उपाय करा

Elections : विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय घडामोडींना वेग; भाजपसह ३ प्रमुख पक्षांनी आधीच डाव टाकला

Foundation According Skin Type: स्किन टाइपनुसार निवडा परफेक्ट फाउंडेशन; मेकअप दिसेल परफेक्ट आणि ग्लोइंग

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघातील माजी संचालकांना सहकार विभागाचा दणका

... तर दोन मंत्री राजीनामा देतील, मित्रपक्षाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT