doctors saved life of kid who fell into chandrabhaga river near pandharpur on kartiki ekadashi 2023 saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत दोन वर्षाची चिमुकली पडली अन् भाविकांत गाेंधळ उडाला, अखेर...

बाळाच्या कुटुंबियांनी वैद्यकीय अधिका-यांचे आभार मानले.

भारत नागणे

Kartiki Ekadashi 2023 :

कार्तिकी यात्रेच्या (kartiki yatra) निमित्ताने आज (गुरुवार) लाखो भाविकांनी चंद्रभागा स्नान (chandrabhaga river) करून विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी याचा ही अनुभव आज भक्तांना आला. या बरोबरच याची देही याची डोळा असा कार्तिकीचा अनुपम्य सोहळा देखील भाविकांनी अनुभवला. दरम्यान चंद्रभागा स्नानासाठी गेलेल्या एकाचे बाळ पाण्यात पडले. त्यास वेळीच उपचार मिळाल्याने ते बचावले. (Maharashtra News)

कार्तिकी एकादशी निमित्त कल्याण येथून आलेल्या आकाश शिंदे हे त्यांच्या आकांक्षा या दाेन वर्षाच्या चिमुकलीला घेवून‌ आज सकाळी चंद्रभागा स्नानासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या चिमुकलीला फिट आली. त्यामुळे ती पाण्यात पडली.

घाबरलेल्या शिंदे यांना स्थानिक स्वयंसेवकांनी मदत करून पाण्यातून बाहेर काढले. या चिमुकलीला 65 एकर परिसरातील महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी दाखल केले. येथील डाॅक्टरांनी त्या चिमुकलीवर उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने‌ त्या चिमुकलीचे प्राण वाचले. शिंदे यांनी वैद्यकीय अधिका-यांचे आभार मानले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT