karoli m village
karoli m village saam tv
महाराष्ट्र

sangli: खराब रस्त्यामुळे लग्न समारंभ थांबले; ग्रामस्थांची खंत

विजय पाटील

सांगली : रस्त्यात पाणी का पाण्यात रस्ता अशी स्थिती सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील करोली एम गावात झाली आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे लग्न समारंभ सुद्धा होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (karoli m villagers demands good road sangli latest marathi news)

सांगली जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील करोली एम गावातील यल्लम्मा रोडवरील गाव वस्तीत जाणार रस्ता खूप खराब झाला आहे. गेले ४० वर्ष हा रस्ता पाण्याखाली आहे. यल्लम्मा रोडवरील तोडकर वस्ती इथल्या ग्रामस्थांना या पाण्यातूनच वाट काढत जावे लागत आहे.

या रस्त्यावर ओढ्याचे पाणी सतत येत असते. पावसाळ्यात तर हा रस्ताच बंद होतो. पाण्यातूनच वाट काढत ग्रामस्थ (villagers) प्रवास करतात. या रस्त्याची स्थिती पाहिल्यानंतर वस्तीवरील लग्न समारंभ सुद्धा होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकर रस्ता करून द्यावं अशी मागणी होत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT