Ajit Pawar on Phone Tapping Case SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar: कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळवण्याच्या प्रयत्नात, अजित पवारांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळवण्याच्या प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली.

विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.

कर्नाटक सरकार भाषेबाबत गळचेपी करत असतानाच आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूर मधील पाणी स्वतःच्या धारवाडमध्ये वळवू पाहत आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. तसे असल्यास कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अखत्यारीत खानापूर तालुक्यातील ही गावे येतात.

याचबरोबर या प्रकल्पामुळे पाणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे. महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारने कळसा भांडुरा प्रकल्प हाती घेणे गैर असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत eKYC साठी मुदतवाढ देणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Bus Crash: प्रवासी बस २०० मीटर दरीत कोसळली, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी; पेरूमध्ये भयंकर अपघात

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

SCROLL FOR NEXT