Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Karnataka CM on Sanjay Raut: संजय राऊतांच्या वक्तव्याने कर्नाटकला मिरच्या झोंबल्या; थेट विधानसभेत पडसाद

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘संजय राऊत एजंट ऑफ चायना’ असं म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

बेळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्याचे पडसाद कर्नाटक विधानसभेत उमटले. राज्यातील नेत्यांना बेळगावात येण्यापासून मज्जाव करणाऱ्या कर्नाटक सरकारला संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला येण्यापासून सातत्याने रोखलं जात असेल तर चीनप्रमाणे आत घुसावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

राऊत यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘संजय राऊत एजंट ऑफ चायना’ असं म्हटलं. संजय राऊत यांचं चायना प्रेम त्यांना देशद्रोही ठरवणारे आहे, अशी टीका बोम्मई यांनी केली आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकचे विधानसभा विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी संजय राऊत यांनी कर्नाटकामध्ये चीनप्रमाणे घुसण्याची भाषा केली आहे. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर द्यावे, अशी मागणी केली होती.

देशाची एकता आणि अखंडता महत्वाची आहे. मात्र, काही जणांकडून भाषेचे तथ्य पाळले जात नाही. संजय राऊत यांनी बेळगावमध्ये येण्यापासून कर्नाटकाकडून सातत्याने रोखणे सुरु राहिल्यास चीनच्या धर्तीवर घुसखोरी करावी लागेल, असा इशारा दिला आहे. हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांचे हे वक्तव्य चीनचे एजंट असल्याप्रमाणे आहे.

चीनप्रमाणे त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय सैनिकाप्रमाणे त्यांना परतावून लावू. विनाकारण गोंधळ घालण्यास थारा दिला जाणार नाही. शिवाय त्यांना कायदेशिरित्या कसे रोखता येईल, हे आम्हाला माहिती आहे, असं देखील बोम्मई यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT