Karmala News Manoj Jarange Patil's warning to Shinde-Fadnavis-Pawar government on Maratha reservation Kunbi certificate Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करा, अन्यथा... मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil Karmala Sabha

मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून अंतरवाली सराटी इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, धाराशिवमधील सभेनंतर जरांगे रात्री उशीरा करमाळा येथील मराठा बांधवांना देखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी करमाळ्याच्या सभेत दिला. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी समाजासाठी लढत राहणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच पण मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असं आवाहनही मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा बांधवांना केलं.

करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी हजारो मराठा बांधव उपस्थित होते. दरम्यान रात्री आठ वाजता होणारी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली. तब्बल पाच ते सहा तास उशिराने सभा झाली‌ तरी ही मराठा तरूणांमध्ये उत्साह कायम होता.

प्रत्येक गावोगावी लोकांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे येथे यायला उशीर झाला. मराठा समाज बांधव गाडीला आडवे पडून मला थांबवून माझे स्वागत करत होते. त्यामुळे मला यायला उशीर झाला. इतक्या वेळानंतर ही तुम्ही माझ्यासाठी बसून आहात. नक्कीच तुमच्या या सभेची महाराष्ट्र नोंद घेईल, असं सांगत जरांगे पाटील यांनी सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT