karad, bank of india, satara crime news
karad, bank of india, satara crime news saam tv
महाराष्ट्र

दामिनी पथकाची धाडसी कारवाई; BOI चं एटीएम केंद्र फाेडणा-यांवर मारली झडप, एक अटकेत

साम न्यूज नेटवर्क

क-हाड : क-हाड (karad) शहरानजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम (atm) केंद्र फोडणाऱ्यास पाेलीस (police) दलाच्या दामिनी पथकानं एकास जेरंबद केले आहे. दरम्यान संबंधित चाेरट्यास धरताना पाेलिसांची आणि त्यांची झटापट झाली परंतु पाेलिसांनी धाडसाने त्यास पकडले. (karad latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : गजानन हौसिंग सोसायटी परिसरात बँक ऑफ इंडियाचे (bank of india) या बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. या एटीएम सेंटरमध्ये चाेरी करण्याच्या उद्देशाने चाेरटे आले हाेते. ते एटीएमचे मशिन फाेडण्याच्या तयारीत हाेते. त्याच वेळी पाेलीस दलाचे दामिनी पथक तिथं आले.

या पथकास संशय आल्याने त्यांनी संबंधितास हटकले. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्याजवळील असणारा स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पाेलीसांनी डाेळ्यांची जळजळ हाेत असताना देखील चाेरट्यांवर झडप मारली. त्यांना पकडले. दरम्यान पाेलिस आणि चाेरट्यांमध्ये झटापट झाली. त्यातील एक चाेरटा पळून जाण्यास यशस्वी झाला मात्र एकास पाेलिसांनी पकडून ठेवलं. दरम्यान डोळ्यात स्प्रे मारल्याने जखमी पोलीसास येथील कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाेलिसांच्या या धाडसाचे समाज माध्यमातून (social media) काैतुक हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT