Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याणमध्ये तरूणाचा जीवघेणा स्टंट, सिमेंटच्या बॉक्समध्ये १२ तास कोंडलं

Kalyan News : कल्याणजवळील मोहने लहुजी नगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. ए. एस .रोशन असे या स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लहुजी मैदानाच्या मधोमध काही लोकांनी एक सिमेंटचा चबुतरा बनवला आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : पोटाची खळगी भरण्यासाठी एका तरुणाने चक्क जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी स्वतःला तब्बल बारा तास सिमेंट काँक्रीटच्या बंदिस्त चबूतऱ्यात कोंडून घेतलं होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कबुतरा उघडण्यास लावत तरुणाला सुखरूप बाहेर काढले. रोशन पोटासाठी सायकलवर डान्स करणे, काचा खाणे, काचांवर चालणे अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करत असल्याची माहिती दिली.

कल्याणजवळील मोहने लहुजी नगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. ए. एस .रोशन असे या स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लहुजी मैदानाच्या मधोमध काही लोकांनी एक सिमेंटचा चबुतरा बनवला आहे. या बंदिस्त चबुतऱ्याच्या आत रोशन याने स्वतःला बारा तास कोंडून घेतले. आजूबाजूचे नागरिक हा खेळ पाहत होते. तसेच या चबुतऱ्यावर पैसे ठेवत होते. धक्कादायक म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बारा तास हा सर्व प्रकार सुरू होता. 

पोलिसांनी काढले बाहेर 

दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली. या नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवत कबुतरा उघडण्यास सांगितल. त्यातून रोशन हा सुखरूप बाहेर आला. काही महिलांनी त्याचा सत्कार केला. हा खेळ बघण्यासाठी लोकांची गर्दी होती. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त होती. 

धक्कादायक म्हणजे मोहने पोलीस चौकीच्या लागून मैदानावर हा सर्व प्रकार सुरू होते. रोशन याने केलेला हा जीवघेणा खेळ ज्याठिकाणी सुरु केला होता. याबाबत रोशन याने पोटासाठी मी असा प्रकारच्या स्टंट नेहमी करीत असतो. त्यापैकी हा एक स्टंट असल्याचे म्हटले आहे. मात्र रोशनचा हा खेळ पाहून लहान मुलं हे देखील असा खेळ करू शकतात, याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

SCROLL FOR NEXT