Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : देशभरात शंभरहून अधिक गुन्हे, सहा राज्यातील पोलीस मागावर असलेला चोरटा कल्याण पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : रामविलास गुप्ता या आरोपीला ठाण्यात एका तपासानिमित्त १० एप्रिलला ठाणे नगर येथे घेऊन आले होते. या दरम्यान पोलिसांना गोंगारा देत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला होता.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: देशभरात शंभरहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याच्या शोधात सहा राज्यातील (Police) पोलीस मागावर होते. या दरम्यान तो गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला असताना कल्याण (Kalyan) कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

रामविलास उर्फ रामा गुप्ता असं ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुजरात पोलिस रामविलास गुप्ता या आरोपीला (Crime News) ठाण्यात एका तपासानिमित्त १० एप्रिलला ठाणे नगर येथे घेऊन आले होते. या दरम्यान पोलिसांना गोंगारा देत रामविलास गुजरात पोलिसांच्या (Gujrat Police) तावडीतून निसटला होता. रामविलास हा कुख्यात चोरटा आहे. उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याने देशभरात चोरीचे गुन्हे केले आहेत. शंभरहून जास्त गुन्हे रामविलास याच्या विरोधात दाखल आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यात तो अनेक गुन्ह्यात फरार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने त्याच्या शोधात अनेक पोलिस पथके काम करीत होती. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांना पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांनी रामविलास बद्दल माहिती दिली. कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिनकर पगारे यांचे पोलिस पथक कल्याणनजीक म्हारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहोचले. रामविलास त्याठिकाणी बसला असताना पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरत त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणार; रविंद्र चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT