Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : बसमध्ये चढताना पर्समधून सात तोळे सोन्याचे दागिने लांबविले; कल्याण एसटी डेपोमधील घटना

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रवासी नागरिकांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणे, पाकीट मारणे अशा अनेक घटना स्टेशन परिसरात घडत आहेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : गावी जाण्यासाठी कल्याण एसटी डेपोत बसमध्ये चढत असताना आरपीएफ जवानाच्या (Kalyan) पत्नीच्या बॅगेतून तब्बल सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रवासी नागरिकांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणे, पाकीट मारणे अशा अनेक घटना स्टेशन परिसरात घडत आहेत. अशीच एक घटना आज स्टेशन परिसरातील कल्याण एसटी डेपोमध्ये घडली. आरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी सारिका शिंदे या आपल्या गावी जाण्यासाठी कल्याण एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहत होत्या. यावेळी त्यांच्या जवळील पर्समध्ये सात तोळे सोन्याचे दागिने होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बस आल्याने सारिका मुलांसह बसमध्ये चढत होत्या. यावेळी त्यांनी दागिने असलेली पर्स मुलीकडे दिली. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून सात तोळे सोन्याचे दागिने चोरले. काही वेळानंतर शिंदे यांच्या बॅगेतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत हा चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी सारिका शिंदे यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT