Kalyan Politics Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Politics : कल्याण पूर्वेत महायुतीत टेन्शन वाढलं; शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत

Kalyan News : कल्याण पूर्व मतदार संघ शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष नवीन नाही

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर कल्याण पूर्वेत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढवणार; असा इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिला. त्यामुळे शिवसेना शहरप्रमुखांनी बंडाचे निशाण फडकावल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्व मतदार संघ शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर (Shiv Sena) शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातील तणाव आणखीनच वाढला आहे. सध्या भाजप आमदार गणपत गायकवाड या प्रकरणात जेलमध्ये आहेत. तर (BJP) भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजप कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख पद दिले आहे. सुलभा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित आहे. 

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील कल्याण पूर्व मतदार संघावर दावा केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना तीन वेळा नागरिकांनी आमदार पदी निवडून दिले. मात्र गेल्या पंधरा वर्षात कल्याण पूर्व बकाल झाले आहे. नागरिकांना सोयी सुविधा नाहीत, पाणी समस्या आहे, रस्ते नाहीत, शासकीत रुग्णालय नाही, नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली, तर अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा दिला आहे. यामुळे आता याबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT