Kalyan News
Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कल्याणमध्ये संततधार पावसाने घराचे छत कोसळले; कुटुंबातील चार जण जखमी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण- डोंबिवली परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कल्याण पूर्व लोकग्राम परिसरामधील चाळीतील घराचे छत कोसळले. दुपारच्या सुमारास हि घटना घडली असून यावेळी घरात झोपलेले कुटुंबातील सहाजण जखमी झाले आहेत. यात चार जणांना अधिक मार लागला असून दोनजण किरकोळ जखमी आहेत. 

कल्याण (Kalyan) पूर्वच्या लोकग्राम, न्यु जिम्मी बाग जयप्रकाश नगर मधील हि घटना आहे. कल्याण- डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नसला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह परिसराच्या सकल भागात पाणी साचले आहे. तर कल्याण शीळ फाटा रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान या संततधार (Rain) पावसात लोकग्राम परिसरातील एका घराचे चाट कोसळले आहे. छतावर सिमेंटचा पत्र टाकण्यात आला होता. 

दुपारी परिवार झोपला असताना घडली दुर्घटना   
सदरची घटना घडली यावेळी घरात असलेले परिवारातील सर्व सदस्य दुपारच्या वेळी झोपलेले होते. याच वेळी घराच्या छतावर असलेला पत्रा अचानक कोसळल्याने कुटुंबातील चार जण जखमी झाले. जखमीमध्ये 13 वर्षीय मुलाचा समावेश असून दोन लहान मूल किरकोळ जखमी आहेत. यात शिवपूजन प्रजापती (वय २५), प्रिन्स प्रजापती (वय १३), ललिता प्रजापती (वय ३२), उर्मिला प्रजापती (वय ४२), ज्योती प्रजापती (वय १६), प्राची प्रजापती (वय १८) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session : चर्चा अर्थसंकल्पावरची...वाद रंगला रवी राणांच्या वक्तव्याचा; सत्ताधारी-विरोध सभागृहात भिडले

Special Report: लिफ्टमध्ये लिहिलं गेलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?

Special Report: मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, जरांगेवर कोणाची नजर?

Special Report: आधी हिजाबबंदी,आता ड्रेसकोड;नेमकं चाललंय काय?

Special Report: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची लूट? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT