Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : अन्यथा रस्ता होऊ देणार नाही; दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या रिंगरोड बाधितांची मागणी

Kalyan News : एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. रिंग रोडमुळे टिटवाळा पासून ते डोंबिवलीपर्यंतचा प्रवास अवघ्या काही मिनिटात करता येणार आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण शहरात दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या रिंग रोडमध्ये अनेक ग्रामस्थांच्या घरं, जमिनी जात आहेत. या (kalyan) बाधित शेतकऱ्यांनी घरांच्या बदल्यात घरे तर जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला देण्यात यावा; अशी मागणी (KDMC) महापालिकेकडे केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर घर आणि जमिनीचा ताबा सोडणार नाही. रिंग रोड प्रकल्प होऊ देणार नाही; असा इशारा देखील ग्रामस्थांनी महापालिकेला दिला. (Breaking Marathi News)

कल्याण- डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी समस्येच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. रिंग रोडमुळे टिटवाळा पासून ते डोंबिवलीपर्यंतचा प्रवास अवघ्या काही मिनिटात करता येणार आहे. या रिंग रोडसाठी महापालिकेकडून भूसंपादन सुरू आहे. दुर्गाडी ते गांधारी दरम्यान शेतकऱ्यांची घरे व जमिनी बाधित होत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाधित शेतकऱ्यांनी आमचा शहराच्या विकासाला विरोध नाही, रिंग रोडमुळे शहराचा विकास होणार हे चांगलच आहे. मात्र आमच्या पिढ्यानपिढ्या या गावात गेलेल्या आहेत. या रिंग रोड जाण्यासाठी आमचे घरे जमिनी बाधित होतात. घरांच्या मोबदल्यात आम्हाला महापालिकेने चांगल्या ठिकाणी घरात आहेत. तसेच जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही घर आणि जमिनीचा ताबा महापालिकेला देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

शिवसेनेचे युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी दुर्गाडी ते मोठागाव दरम्यानच्या बाधिताना चार टीडीआर जावा अशी मागणी केली, तर दुसरीकडे दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांनी घरांच्या मोबदल्यात घरी व जागेच्या मोबदल्यात रोख मोबदल्याची मागणी केली. त्यामुळे आता रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा तिढा सोडवण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे.आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT