Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: गर्दीचा फायदा घेत केला मोबाईल लंपास; चोरटा चार तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

गर्दीचा फायदा घेत केला मोबाईल लंपास; चोरटा चार तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अवघ्या चार तासात अटक केली. दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आधी अशा प्रकारचे (Kalyan) गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. (Tajya Batmya)

उल्हासनगर येथे राहणारे तक्रारदार सोमवारी दुपारच्या भावाला पनवेल-गोरखपुर एक्सप्रेसमध्ये बसवून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आले होते. एक्सप्रेस आल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची एकच गर्दी झाली. तक्रारदार यांनी भावाचे सामान घेऊन गाडीमध्ये ठेवले व त्यानंतर ते खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातला मोबाईल चोरला. मोबाईल चोरीला गेला हे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चार तासात चोरटा ताब्‍यात

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासात दीपक पवार या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. दीपक पवार याने आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT