Kalyan Railway Station Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: पादचारी पुलावर माथेफिरूचे धक्कादायक कृत्य; कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटनेने तरुणी भेदरली

भर रस्त्यात माथेफिरूचे धक्कादायक कृत्य; कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटनेने तरुणी भेदरली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

कल्याण : रेल्वेने कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला एका माथेफीरूने मिठी मारल्याची धक्कादायक घटना (Kalyan) कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी (Railway) पुलावर घडली. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा ओरड करताच प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चोप दिला. (Tajya Batmya)

पीडित तरुणी आज नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आली. ट्रेन पकडण्यासाठी ती पादचारी पुलावरून चालत जात असताना अचानक एका माथेफिरूने तिला मिठी मारली. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा ओरड केला. आजूबाजूच्या प्रवाशांनी या माथेफिरूला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे घाबरलेली तरुणी त्या ठिकाणाहून निघून गेली. मात्र घटनेबाबत काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे या सातत्याने रेल्वे पोलीस व आर पी एफ ला या घटनेची माहिती देत पाठपुरावा करत होत्या.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध

कल्याण रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पथक नेमून सीसीटीव्हीच्या आधारे या माथेफिरूचा शोध सुरू केला. या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संतोष शर्मा असे माथेफिरूचे नाव आहे. प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत या माथेफिरूला दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 105 गावांमध्ये गारपीट

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT