KDMC School Saam tv
महाराष्ट्र

KDMC School : आयुक्तांनी हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना दिले सराव परीक्षेचे धडे; केडीएमसी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पाहणी

Kalyan News : केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णत: कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केडीएमसीच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्यक्ष शाळांची पाहणी सुरू केली आहे. आयुक्त गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट परिसरातील केडीएमसीच्या शाळेत स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना सराव परीक्षा बाबत आयुक्त गोयल यांनी मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचे धडे दिले. 

केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अधिकारी व शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णत: कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी शाळा प्रवेशाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पुरविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गणवेश, बुट, दफ्तरे अशा आवश्यक सुविधा देखील वर्षाचे सुरवातीला पुरविण्यात येणार असल्याचे केडीएमसीच्या शिक्षण विभागाने सांगितले.

बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी पायाभूत चाचणी 

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशान्वये प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, या पालक अधिकाऱ्यांनी स्वत: शाळेत जावून शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीची पाहणी केली. 

आयुक्तांनी दिली शाळेला भेट 

दरम्यान महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्विकारलेल्या सिंडेकेट येथील शाळा क्र. 95/8 या ऊर्दु शाळेतील, तसेच बारावे येथील शाळा क्र. ६८ आणि बारदान गल्ली येथील ऊर्दु व मराठी शाळेस समक्ष भेट देवून शाळेत चाललेल्या पायाभूत चाचणी परिक्षेची पाहणी केली. तसेच स्वत: खडू हातात घेवून विद्यार्थ्यांना शिकवण दिली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही पायाभूत चाचणी घेतली जात असून, यानंतर सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT