Kalyan Dombivali Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Dombivali : कल्याणच्या सहजानंद चौकात वाहतूक कोंडी थांबणार; केडीएमसीकडून फिरता ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग

Kalyan News : दररोज याठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार आदी प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रण मोठे जिकिरीचे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे वाहतूक कोंडीला शिस्त लागावी, यासाठी केडीएमसीकडून मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता कल्याण पश्चिमेतील सर्वात वरदळीच्या सहजानंद चौकामध्ये फिरता ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न तूर्तास तरी मिटणार आहे. 

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड हा प्रमुख मार्ग आहे. दररोज याठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार आदी प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रण मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातही सहजानंद चौकात तर एकाच वेळी पाच ठिकाणांहून वाहनांची ये- जा असल्याने इथल्या वाहतुकीचे नियोजन करताना शहर वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. 

वाहतूक व वाहनांचा केला जाणार अभ्यास 

या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र येथील वाहतुक, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास पालिकेचा पैसा वाया जाऊ शकतो. याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.  

एक महिना प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग 

सहजानंद चौकात मिळणाऱ्या ५ रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील एक महिना त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार. त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT