Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: इंस्टाग्रामवर ओळख, रेल्वे प्रवासादरम्यान मुलीला पळविले; ४८ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News इंस्टाग्रामवर ओळख, रेल्वे प्रवासादरम्यान मुलीला पळविले; ४८ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

कल्याण : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. या आरोपीला (Kalyan) कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रवींद्र रातंबे असे आरोपीचे नाव आहे. अवघ्या ४८ तासात या मुलीचा शोध घेत पोलिसांनी (Police) आरोपीला बेड्या ठोकल्या. (Breaking Marathi News)

संबंधित अल्पवयीन मुलगी सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान कुटुंबासह प्रवास करत होती. याच दरम्यान अचानक मुलगी गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने या मुलीचा शोध सुरू केला. स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले असता ही मुलगी आढळून आली. पुढील तांत्रिक तपास व खबर्यानी दिलेल्या माहितीच्या (Crime News) आधारे सदर मुलगी आरोपीसह कर्जत येथील एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

मुलगी पालकांच्या स्वाधीन 

कल्याण गुन्हे रेल्वे शाखेच्या पथकाने तत्काळ या गावात धडक देत, आरोपी रवींद्र रातांबे याला बेड्या ठोकल्या. सदर मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. रवींद्र याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून या पीडित मुलीची मैत्री वाढवली होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यानीच तिला पळवून नेल्याचे उघड झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT