Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: घरासमोरच ठेकेदारावर गोळीबार; टिटवाळा येथील धक्कादायक घटना

घरासमोरच ठेकेदारावर गोळीबार; टिटवाळा येथील धक्कादायक घटना

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याणजवळ टिटवाळा परिसरात एका ठेकेदारावर अज्ञात इसमानी गोळीबार केल्याची घटना घडली. उमेश साळुंखे असे ठेकेदाराचे नाव आहे. उमेश याच्या छातीला गोळी लागली असून त्याच्यावर मुंबई (Mumbai) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोर हे पसार झाले असून या प्रकरणी टिटवाळा (Titwala) पोलीस पुढील तपास करत आहेत. (Maharashtra News)

कल्याणजवळ असलेल्या टिटवाळ्यातील सावरकरनगर परिसरात उमेश साळुंखे राहतात. टिटवाळा परिसरात राहणारे उमेश साळुंखे ठेकेदार असून रविवारी रात्रीच्‍या सुमारास ते घराबाहेर उभे होते. याच दरम्‍यान काळ्या रंगाची गाडी आली. गाडीमधून अज्ञात हल्लेखोरांनी उमेश यांच्या दिशेने गोळीबार केला. या हल्ल्यात उमेश साळुंखे यांच्या छातीला गोळी लागली. काही क्षणातच हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झाले.

हल्‍लेखोरांना तपास सुरू

जखमी झालेल्या उमेश साळुंखेला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा (Police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी टिटवाळा पोलिसांनी पथक तयार केले असून हा हल्ला का व कोणी केला? याबाबत हल्लेखोरांना अटक झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT