Saam tv Kalyan Crime
महाराष्ट्र

Kalyan Crime : १९ लाखांचा बनावट विदेशी दारूसाठा जप्त; कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Kalyan News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या पथकाला बनावट विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण भरारी पथकाचे अधिकारी दिपक परब यांच्या पथकाने नेवाळी परिसरात सापळा रचला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: गोव्यावरून स्वस्तातील दारू आणून ती विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून बाटलीला नव्याने स्टिकर लावून विक्री करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लाखो रुपये किमतीची बनावट विदेशी दारू जप्त करत बनावट दारूची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीकांत टरले, किशोर पाटील, प्रदीप बामणे या तिघांना ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या पथकाला बनावट विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण भरारी पथकाचे अधिकारी दिपक परब यांच्या पथकाने नेवाळी परिसरात सापळा रचला. या दरम्यान एक कार संशयित येताना आढळल्याने कार थांबवुन कारची झडती घेतली. या कारमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. 

पडघा, कर्जतमधील गोडाऊनवर छापा 

दारूचा तपास केला असता सदरची दारू बनावट असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतले. तपासा दरम्यान त्याने ही दारू पडघा येथील गोडाऊनमधून आणली असल्याचे सांगितले. यानंतर भरारी पथकाने पडघा येथील गोडाऊनमध्ये छापा टाकला. या गोडाऊन मध्ये देखील बनावट दारूचा साठा आढळून आला. तर तपासा दरम्यान कर्जतमध्ये देखील या बनावट दारूचे गोडाऊन असल्याचे माहिती मिळाली. 

१९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

माहितीनुसार भरारी पथकाने कर्जतमध्ये देखील छापा टाकत बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला. या गोडाऊनमध्ये दारूच्या साठ्यासह दारूच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे बूच, बनावट लेबल, रिकाम्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या. तब्बल १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने श्रीकांत टरले, किशोर पाटील, प्रदीप बामणे या तिघांना बेड्या ठोकल्या. या तिघांव्यतिरिक्त टोळीत आणखी कोणी आहे का याचा शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पथक करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT