KDMC Electric Bus Saam tv
महाराष्ट्र

Electric Bus : कल्याण- डोंबिवलीत धावणार इलेक्ट्रिक बस; दहा बस दाखल, महिनाअखेर चार्जिंग स्टेशन कार्यान्वीत

Kalyan News : प्रदूषण कमी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केडीएमसीला निधी उपलब्ध करून दिला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून कल्याण- डोंबिवली महापालिकेस प्राप्त झालेल्या निधीतून (Kalyan) महापालिकेने २०७ इलेक्ट्रीक बसेस मंजूर झाल्या आहेत. यामधील ९ बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रम ताफ्यात दाखल झालेल्या आहे. या बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु आहे. हे स्टेशन (Electric Bus) उभारण्याचे काम येत्या महिन्या अखेर पूर्ण झाल्यानंतर या बसेस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती केडीएमटीचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी दिली आहे. (Maharashtra News)

केडीएमटी कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनासाठी कायमच पांढरा हत्ती ठरला आहे. परिवहनच्या बस शहरात पुरेशा सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने रिक्षा चालकांची मुजोरी वाढत आहे. यामुळेच शहरातील प्रवाशांना किफायतशीर किमतीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी द्यावा; यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केडीएमसीला निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून परिवहनने २०७ बसेस खरेदी केल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० बस प्राप्त 

यातील १० बसेस दिवाळीपूर्वीच दाखल झाल्या असून या बसेस वसंत व्हॅली येथे उभ्या आहेत. उर्वरित पहिल्या टप्प्यातील बसेस मार्च अखेरपर्यंत आणल्या जाणार आहेत. या बससाठी चार्जीग स्टेशन उभारण्याचे काम देखील सुरू असून डिसेबर अखेरीस चार्जीग स्टेशन कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. ही चार्जीग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या बसेस रस्त्यावर धावतील असेही ते म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT