Kalyan News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : मुख्यमंत्री जनतेला एप्रिल फुल बनवण्याचं काम करताय; ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा आरोप

Kalyan News : राज्यात निर्माण झालेल्या विजेच्या समस्ये बाबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मंगळवारी कल्याणच्या महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांची भेट घेत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये येत्या एप्रिलपासून लोकांची १० टक्के वीज बिल कमी होईल; असं आश्वासन दिलं होतं. मात्र याबाबत कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. लोकांना बिले तर भरावी लागतच आहे. मात्र अनामत रक्कमही भरावी लागतं आहे. अर्थात मुख्यमंत्री हे नागरिकांना एप्रिल फुल करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केला आहे.

राज्यात निर्माण झालेल्या विजेच्या समस्ये बाबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मंगळवारी कल्याणच्या महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांची भेट घेत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच महावितरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात सरकारवर निशाणा साधला आहे. 

नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण  

गेल्या काही दिवसांपासून कल्याण- डोंबिवलीच नाही; तर अनेक ठिकाणी विजे संदर्भात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कल्याण डोंबिवलीत तर अलीकडे तासंतास विजेता लपंडाव सुरू आहे. त्यातच वाढीव वीज बिले, अव्वाच्या सव्वा येणारे डिपॉझिट, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

त्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा 

लोकांना कमीत कमी त्रास होईल; या अनुषंगाने उपायोजना करण्याची विनंती केली. शहरात अनेक कामे सुरू आहे. ही कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या चुकांमुळे विजे संदर्भात प्रश्न निर्माण होतात. तासन्तास वीज गायब होते.अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा; अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT