Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात; बारा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Kalyan News : कल्याण पूर्वेकडील असलेल्या कार्यालयातील राज कोळी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने घर घेतल्याने घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची मागणी केली होती.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाच्या पैशांची (Kalyan) मागणी केली. ठरलेली रक्कम स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या (Bribe) अधिकाऱ्याला ताब्यात घेत तपस सुरु करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

कल्याण पूर्वेकडील असलेल्या कार्यालयातील राज कोळी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने घर घेतल्याने घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडअंती बारा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे एसीबीकडे (ACB) याबाबत तक्रार दिली होती. याची पथकाने पडताळणी करत सापळा रचला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधिकाऱ्यासह अन्य एक ताब्यात  

ठरल्यानुसार तक्रारदार आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहदुय्यम निबंधक कार्यालयात आले. यावेळी राज कोळी यांनी तक्रारदाराकडून १२ हजार स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. ठाणे अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत ही कारवाई केली आहे. राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT