KDMC  Saam tv
महाराष्ट्र

KDMC Abhay Yojana : थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के व्याजमाफी; मालमत्ता कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना

Kalyan News : मालमत्ता कर थकबाकीदारा विरोधात मालमत्ता सील करण्याबरोबरच जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापाठोपाठ थकबाकीची वसुली करण्यासाठी केडीएमसीकडून दोन टप्प्यात अभय योजना राबविण्यात आली

Rajesh Sonwane

अभिजित देशमूख

कल्याण : मालमत्ता कराची थकबाकी अनेकांनी थकविली आहे. यामुळे थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. थकीत मालमत्ता कर वसुली करण्यासाठी केडीएमसीने पुन्हा एकदा अभय योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेत थकबाकीदारांनी १५ जानेवारी दरम्यान थकबाकीची रक्कम भरल्यास १०० टक्के व्याजमाफी तर १५ ते ३१ जानेवारी दरम्यान थकबाकी भरणाऱ्यांना ७५ टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे. 

केडीएमसीने मालमत्ता कर थकबाकीदारा विरोधात मालमत्ता सील करण्याबरोबरच जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापाठोपाठ थकबाकीची वसुली करण्यासाठी केडीएमसीकडून दोन टप्प्यात अभय योजना राबविण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षातील थकित कर आणि त्यावरील थकबाकी व्याजाच्या वसुलीसाठी ७५० कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

२५० कोटींची वसुली 

केडीएमसीने वसुलीचे ठेवलेल्या उद्दिष्टांचा पाठलाग करताना आतापर्यंत सुमारे २५० कोटीची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. तर उर्वरित ५०० कोटीच्या वसुलीसाठी पालिकेने अभय योजना सुरू केली आहे. प्रभाग ई व आय मधील ग्रामपंचायत मिळकतींची बिले दुरुस्त करून देण्यात आली असून सदर मिळकतींना आकारण्यात आलेले व्याज शासन आदेशानुसार यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहे. यामुळे त्यांना अभय योजनेचा लाभ घेता येणार नाही; असे केडीएमसीने स्पष्ट केलं आहे.

दोन टप्प्यात राबविणार योजना 

केडीएमसीच्या अभय योजना हि दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान थकबाकीची रक्कम भरणा करणाऱ्यांना १०० टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान थकबाकीचा भरणा करणाऱ्यांना ७५ टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे. अभय योजनेमुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार असून केडीएमसीच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात काँग्रेस नेत्यांच आंदोलन

Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT