Kalyan Railway Yard Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Railway Yard : खेळता खेळता चढला मालगाडीवर; रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीर

Kalyan News : कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात समीर बेग हा तेरा वर्षाचा मुलगा कुटुंबासह राहतो. दरम्यान ३० जानेवारीला दुपारी समीर शाळेतून आल्यानंतर त्याने त्याच्या आईला मी कबड्डी खेळायला चाललो असे सांगितले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या खडेगोळवली परिसरात वास्तव्यास असलेला एक मुलगा कल्याण रेल्वे यार्डमध्ये खेळत होता. (Kalyan) खेळता खेळता तो यार्डात उभ्या असलेल्या मालवाहू गाडीच्या टपावर चढला. यात त्याचा स्पर्श रेल्वेच्या ओव्हरहेड वायरला होऊन शॉक (Electric Shock) लागल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

सदरची घटना कल्याण पूर्व रेल्वे यार्ड परिसरात घडली असून समीर बेग असे जखमी मुलाचे नाव आहे. कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात समीर बेग हा तेरा वर्षाचा मुलगा कुटुंबासह राहतो. दरम्यान ३० जानेवारीला दुपारी समीर शाळेतून आल्यानंतर त्याने त्याच्या आईला मी कबड्डी खेळायला चाललो असे सांगितले. यानंतर समीर हा कल्याण पूर्वेकडील (Railway) रेल्वे यार्डात गेला. त्याठिकाणी मालगाडीवर चढला. मालगाडीच्या टपावर उभा असताना त्याचा हात रेल्वे ओव्हरहेड वायरला लागला असावा, त्यामुळे समीरला जोरदार झटका बसला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकृती चिंताजनक 

घटनेच्या माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) घटनास्थळी धाव घेत तात्काळ समीरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत समीर सुमारे ७० ते ८० टक्के भाजला गेला असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची कल्याण रेल्वे पोलिसांनी नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Lips Care Tips: कोरड्या ओठांवर 5 घरगुती उपाय, ओठ होतील मऊ आणि मुलायम

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

T20 World Cup 2026: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर होणार? रन रेटनं वाढवलं टेन्शन

Thyroid Disease Symptoms: अचानक जास्त थंडी वाजतेय? सावध व्हा, थायरॉईडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Ladki Bahin Yojana: जानेवारीचा हप्ता खात्यात जमा, पण या लाडकींना ₹१५०० मिळणार नाहीत

SCROLL FOR NEXT