Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: २४ तासात ११ मोबाईल चोरी; काही तासातच सात सराईत चोरटे गजाआड

२४ तासात ११ मोबाईल चोरी; काही तासातच सात सराईत चोरटे गजाआड

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक म्‍हणजे गेल्या २४ तासात (Kalyan) कल्याण व शहाड रेल्वे स्थानकावर एकूण अकरा मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्शवभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) चांगली कामगिरी करत अवघ्या काही तासातच सात आरोपींना बेड्या ठोकत मोबाईल हस्तगत केले. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहाड उल्हासनगर आसपासच्या रेल्वे स्थानकांमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरटे गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरत होते. कालचा दिवसभरामध्ये कल्याण रेल्वे स्थानकातून दहा प्रवाशांचे मोबाईल तर शहाड येथून एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांचे एक पथक नेमण्यात आले.

११ चोरटे ताब्‍यात

दिवसभरातील रेल्वे स्टेशनवरील (CCTV) सीसीटीव्ही तपासात खबऱ्यांकडून माहिती घेत अवघ्या काही तासात कल्याण रेल्वे पोलिसांनी तब्बल सात आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अकरा मोबाईल हस्तगत केले. अहमद शेख, विशाल काकडे, मोहम्मद हसन अन्सारी, सरजील अन्सारी, सचिन गवळी, मंगलअली शेख, संदीप भाटकर अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे सातही आरोपी सराईत चोरटे असून त्यांच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझीनेसचा त्रास होतोय? हे तेल नियमीत लावा मिळेल सॉफ्ट सिल्की केस

रायगड जिल्ह्यात सात तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Paneer Chilli Recipe: हॉटेल स्टाईल टेस्टी पनीर चिली बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

सावधान, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे ! अतिमुसळधार पावसाचा इशारा; महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

जून कोरडाच, जुलैमध्येही पावसाचा तोटा? पेरण्या रखडल्या, बळीराजा संकटात

SCROLL FOR NEXT