KDMC News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील त्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र; २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

Kalyan News : कल्याण- डोंबिवलीअंतर्गत २७ गावातील कामगारांना कायम करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. मात्र कारवाई होत नसल्याने शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक घेत निर्णय घेतला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील कामगार मागील दहा वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत होते. शासनाने कायम करण्याबाबत आदेश दिल्यानंतर देखील त्यांची नियुक्ती करण्यात येत नव्हती. अखेर या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले असून या सर्व कर्मचाऱ्यांना केडीएमसीकडून १५ ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. 

कल्याण- डोंबिवली महापालिकेअंतर्गत असलेल्या २७ गावातील या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम होती. मात्र आता प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच, या कामगारांना टप्प्याटप्प्याने नियुक्ती पत्र दिली जाती. यातील पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्टला देणार असल्याचे आश्वासन केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली.

ग्रामीण भागात चालविणार बस 

ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच स्मार्ट सिटीमधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत. 

यावरही करणार तातडीने कारवाई 

त्याचप्रमाणे सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपासह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. त्याच बरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT