Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : गाडी पार्किंगच्या वादातून राडा, एकाचा मृत्यू; डोंबिवली गोळवली परिसरातील घटना

Kalyan Dombivali : डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता या व्यक्तीचे पेपरचे गोडावून आहे. १३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली गाडी घेऊन गोडावून समोर आला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: गाडी पार्किंगवरून झालेल्या वादामुळे काही तरुणांमध्ये तीन दिवसांपूर्वी जोरदार राडा झाला होता. या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हाणामारीत जखमी झालेल्या बबलू गुप्ता याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलिस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता या व्यक्तीचे पेपरचे गोडावून आहे. १३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली गाडी घेऊन गोडावून समोर आला. गोडावूनसमोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा; मला त्याठिकाणी गाडी उभी करायची असे सांगितले. चालक गाडी मागे पुढे करीत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामा बाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणाना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने  कामगार आणि बबलूला मारहाण केली. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी पळ काढला, मात्र बबलू तिथेच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गोडावून समोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान बबलू याचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. बबलूचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का? यासाठी पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. बबलू याच्यावर गॅस सिलिंडरचा बाटला टाकला होता. तो आजारी देखील होता. आत्ता मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी काही  तरुणाना ताब्यात घेतले आहे. गाडी पार्किंगच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

Accident : शेतात कामासाठी निघाले,पण वाटेतच काळाचा घाला; पुण्यात भीषण अपघातात नवरा-बायकोचा मृत्यू

Muskmelon Juice Recipe : सकाळच्या नाश्त्याला रोज प्या एक ग्लास खरबूज ज्यूस, एक घोट पिताच व्हाल फ्रेश

Ladki Bahin Yojana: मार्चचे १० दिवस उलटले, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही;लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Daily Yoga Exercise: दररोज घरी कोणती योगासने करावीत?

SCROLL FOR NEXT