Dombivli News Marathi, Dombivli Rain News Today, Kalyan Dombivli Latest News Saam TV
महाराष्ट्र

काय ते खड्डे, काय ते पाणी, काय तो चिखल; डोंबिवलीच्या भोपर रस्त्याची अशीच स्थिती!

डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) मधील रस्ता पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आहे. तर कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यावर (Road) काय ते पाणी, काय खड्डे, काय तो चिखल, मात्र केडीएमसी अधिकारी आणि ठेकेदार ओके मध्ये आहेत, अशीच परिस्थिती झाली आहे. (Dombivli News Marathi)

पावसाला आता कुठे सुरवात झाली नाही तोच डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 27 गावांत अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या कामासाठी हा भोपरचा अर्धा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. (Kalyan Dombivli Latest News)

गेल्या महिन्यात कंत्राटदाराने या रस्त्याचे डांबरीकरण केले. परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. भोपर कमान ते शनी मंदिर पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हा रस्ता उतारावर असल्याने रस्त्यावरुन पावसाचे पाणी वहात असते. गतीरोधकांमुळे पावसाचे पाणी साचत असून हे पावसाचे पाणी जाण्यासाठी चक्क गतीरोधकच खोदून पावसाच्या पाण्यास वाट काढून देण्यात आली आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.

रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोलन करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT