Kalyan Doctor Attacked While Explaining Patient’s Condition saam tv
महाराष्ट्र

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Doctor Assaulted Inside Hospital Cabin: कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मुलाने डॉक्टरला केबिनमध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे.

Bharat Jadhav

  • कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याचा आरोप.

  • रुग्णाच्या आजाराबाबत डॉक्टर माहिती देत असताना वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • रुग्णाच्या मुलाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये येऊन मारहाण केल्याचा आरोप

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एका रुग्णासोबत आलेला त्याचा मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला होता.

डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाच्या मुलगा विनीत देशमुख संतापला. त्यानंतर रुग्णाने स्वत आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, काही वेळाने तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला.या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालये सुरक्षितपणे चालवायची कशी, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे.डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांना शिवसेना नगरसेवकाककडून मारहाण

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि दोन परिचारिकांना शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी म्हात्रेंना तुरुंगवारी करावी लागेल. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर करत त्यांना जिल्हाबंदी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

SCROLL FOR NEXT