Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : भाजी विक्रेत्याला दगडाने मारहाण करत लुबाडले; कल्याण रेल्वे स्कायवॉकवरील घटना

Kalyan News: रेल्वे स्टेशन परिसर आता चोरट्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी लुबाडण्यात येत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. यात कल्याण रेल्वे स्कायवॉकवर भाजी विक्रेत्यास लुबाडण्याची घटना घडली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्व- पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाने हल्ला करत एका इसमाचा मोबाईल आणि रोकड लुबाडल्याची घटना समोर आली आहे. सुरेश सिंह असे या जखमी झालेल्या इसमाचे नाव असून तो भाजीविक्रेता आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

रेल्वे स्टेशन परिसर आता चोरट्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी एकटा व्यक्ती असल्याचे साधून त्याला लुबाडण्यात येत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. यातच कल्याण रेल्वे स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास भाजी विक्रेत्यास लुबाडण्याची घटना घडली आहे. सुरेश समर बहादूर सिंह असे लुबाडणूक करण्यात आलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. भाजी विक्रीचा व्यवसाय  करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. 

भाजीपाला आणण्यासाठी जात असताना अडविले  

दरम्यान भाजी विक्रीसाठी सुरेश सिह हे काल पहाटे भाजीपाला घेण्यासाठी कल्याण पूर्व येथून स्कायवॉकवरून कल्याण रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते. याच दरम्यान दोन चोरट्यानी त्यांना अडविले. यानंतर सुरेश याना दगडाने मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख सहा हजार रुपये लुबाडून पसार झाले. या हल्ल्यात सुरेश सिंह गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसात गुन्हा दाखल 

सदर घटना घडल्यानंतर सुरेश यांनी याप्रकरणी कल्याण कोळसवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या स्कायवॉकवरून दररोज हजारो प्रवासी ये- जा करत असतात. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT