Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : पोलिसांच्या गाडीतून चोरटा झाला पसार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर फरार चोरट्याला अटक

Kalyan News : उल्हासनगर सेंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चोरीच्या प्रकरणात चोरट्याला उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी या चोरट्याचा ताबा घेतला होता

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी सराईत चोरट्याला अटक केली. त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला आधारवाडी जेलमध्ये नेत असताना या चोरट्याने पोलिसांच्या गाडीतून चकवा देत पळ काढला. या चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली. अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला उल्हासनगर ओटी सेक्शन येथून बेड्या ठोकत चोरट्याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

उल्हासनगर सेंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चोरीच्या प्रकरणात संजू वाघरी या चोरट्याला उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी बेड्या ठोकल्या होता. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी संजू वाघरी या चोरट्याचा ताबा घेतला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी चोरट्याला कल्याण न्यायालयात हजर केलं. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस त्याला गाडीतून आधारवाडी कारागृहात घेऊन जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते.

गाडी हळू होताच काढला पळ 

याच दरम्यान निक्की नगर परिसरात पोलिसांच्या गाडीची गती कमी झाल्याचा फायदा घेत संजू वाघेरी याने पोलिसांना चकवा देत गाडीतून बाहेर निघत पळ काढला. पोलिसांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र हा चोरटा जवळच असलेल्या वर टॅक्स या इमारती समोरील मोकळ्या मैदानात झाडाझुडपांचा आसरा घेत गायब झाला होता. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

पाच तासांच्या प्रयत्नानंतर चोरटा हाती 

पोलिसांनी सुमारे पाच तासापासून चोरट्याचा शोध सुरू होता. चोरट्याचा माग काढत पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. पोलिसांची विविध पदके संजूच्या शोधासाठी तैनात करण्यात आली. उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथकाच्या गस्त सुरू असताना उल्हासनगर ओटी सेक्शन भीमनगर परिसरात संजू आढळला. या पथकाने तात्काळ संजूला ताब्यात घेत खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT