Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने मित्रांमध्ये राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Kalyan News : महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी दिलेला तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक म्हणजे एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: मित्राने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; म्हणून झालेल्या वादातून मित्रांनीच एकमेकावर हल्ला चढविला. चाकूने वार करत एकमेकांना गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील के के वाईन्स समोर घडली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी दिलेला तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक म्हणजे एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे.

कल्याण पश्चिम येथे केके वाईन शॉपच्या बाजूच्या गल्लीत शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हि घटना घडली आहे. यात महेंद्र निचित याने त्याचा मित्र तेजस निखारगे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र तेजस याने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने महेंद्र याने लागलीच त्याच्याकडील धारदार चाकूने वार करत तेजस याला गंभीर जखमी केले. 

पोलिसात तक्रार दाखल 

तर सोबत असलेल्या मोटरनी त्याला सोडविण्यासाठी गेले असता मित्र मोहन नाडार आणि अभिनंदन खरात यांच्यावर देखील वार करत जखमी केल्याची तक्रार तेजसच्या मित्राने महात्मा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. हा सर्व प्रकार एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घडला असल्याने खळबळ उडाली आहे. 

परस्पर विरोधात तक्रार 

तर याचवेळी महेंद्र याने आपल्या तक्रारीत आपण घरी जात असताना आपल्या ओळखीच्या तेजस निखरगे याने आपल्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने तेजससह त्याच्या दोन मित्रांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान हे दोघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT