Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : कल्याणमध्ये भरदुपारी घरफोडी; ४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Kalyan News : कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. पत्रीपुल परिसरातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या भवानी चाळ येथील एका वृद्ध महिलेच्या घरात भर दुपारी घरफोडी करण्यात आली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : वर्दळ असलेल्या परिसरात भर दुपारी घरात घुसून दरोडा टाकण्यात आल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. यात चोरट्याने ७० वर्षीय वृद्धा घरात एकटी असताना घरातून ९ तोळे सोनं आणि दीड लाखांची रोख रक्कम असे तब्बल ४ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान घरफोडी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. कल्याण पूर्वेतील पत्रीपुल परिसरातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या भवानी चाळ येथील एका वृद्ध महिलेच्या घरात भर दुपारी घरफोडी करण्यात आली आहे. वृद्ध महिला घरात एकटी असताना चोरट्यानी घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्याने तब्बल ४ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हा चोरटा या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसा कडून आरोपीचा शोध सुरु आहे. मात्र भर वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या सुमारास घरफोडी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

महिलेचा वेष करत चोरी 

पालघर : महिलेचे वेशांतर करून चोरट्याचा मोबाईल शॉपवर डल्ला मारला आहे. बोईसर रेल्वे स्थानकाजवळील दोन मोबाईल शॉपवर चोरट्याचा शटर तोडून चोरी केली आहे. यात तब्बल १३ महागडे मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला असून श्री टेलिकॉम आणि वीरांश मोबाईल शॉपमध्ये चोरी झाली असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Crime: परदेशातून यायचा, 10 वर्षाच्या बालिकेला दारू पाजून अत्याचार करायचा, आईच मुलीला नराधम म्हाताऱ्याकडे सोडायची

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

SCROLL FOR NEXT