Kalyan Accident Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Accident : थरकाप उडविणारा अपघात; ट्रकच्या चाकाखाली सापडली दुचाकी, वडिलांसह मुलगी गंभीर जखमी

Kalyan News : कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक परिसरात आज सकाळी अपघात झाला. अपघातात दहा चाकी खतांनी भरलेला ट्रक कल्याणच्या दिशेने येत होता. याच दरम्यान समोरून एका दुचाकीवर वडील आणि मुलगी येत होते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारा अपघात घडला आहे. या अपघातात मुलगी व वडील थोडक्यात बचावले असून दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौक परिसरात आज सकाळी हा अपघात झाला आहे. या अपघातात दहा चाकी खतांच्या गोण्यांनी भरलेला ट्रक कल्याणच्या दिशेने येत होता. याच दरम्यान समोरून एका दुचाकीवर वडील आणि मुलगी येत होते. मात्र अचानक दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकच्या खाली आली. यामुळे वडील आणि मुलगी दोन्ही ट्रकच्या टायर खाली आले. 

सुदैवाने वाचले प्राण 

दुचाकी थेट ट्रक खाली गेल्यानंतर ट्रक चालकाने लागलीच ट्रक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र चाकाखाली सापडल्याने या दोघांच्याही डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मनोहर तांबे असे वडिलांचे तर मुलगी प्रज्ञा तांबे अशी दोघांची नावे आहेत. दोघेही भिवंडीला राहणारे होते कामानिमित्त ते कल्याण मध्ये आले होते. दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ट्रक चालकावर गुन्हा दाखल 

अपघात घडल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सदर अपघात प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी ट्रकच्या ड्रायव्हरला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT