Debashish Bhattacharya Google
महाराष्ट्र

'कलमा वाचला म्हणूव जीव वाचला' देबाशिष भट्टाचार्यांनी सांगितला थरारक अनुभव

Debashish Bhattacharya: लोक शांतपणे कलमा पठण करत होते, मीही सामील झालो. इतक्यात पोलीस गणवेशातील दहशतवादी आले. त्यापैकी एकाने शेजारी झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली.

Tanmay Tillu

मी माझ्या कुटुंबासह एका झाडाखाली झोपलो होतो. तेव्हा अचानक मला आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. लोकं कलमा पठण करत होते. स्वाभाविकपणे मीही तो पठण करू लागलो. काही क्षणात पोलीस गणवेशातील दहशतवादी तिथे पोहोचले. त्यापैकी एक आमच्याकडे आला आणि माझ्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली.

ही आपबीती सांगतायत. धर्मानं हिंदू असलेले आसाम विद्यापीठातील बंगाली विभागाचे सहयोगी प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य त्यांची कहाणी ही जिवंत राहण्याची, विश्वासाची आणि नशिबाची आहे. देबाशीष पहलगाम हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावलेत. बैसरनजवळ झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात ते अडकले होते. त्यांनीच या भयावह क्षणांबद्दल सांगितलंय.

बंदूकधारी माझ्याकडे वळला. त्याने थेट माझ्याकडे पाहिले आणि विचारले, ‘काय करतोयस?’ मी आणखी जोरात कलमा पठण करू लागलो. मला नाही माहिती मला असे करण्यास कशाने प्रवृत्त केलं. मात्र ते ऐकून तो क्रुरकर्मा दहशतवादी वळला आणि निघून गेला.

मात्र देबाशीष यांच्या जगण्याची थरारक कहाणी इथेच संपत नाही. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष यानंतरही सुरुच राहीला. देबाशीष आणि त्यांची पत्नी संधी साधून उठले आणि त्यांनी एक कुंपण ओलांडलं मात्र ते रस्ता चुकले अखेर घोड्यांच्या खुरांच्या खुणांचा माग काढत त्यांनी हॉटेल गाठलं. पहेलगाममधील नरसंहारानं अनेक कुटुंब उद्धवस्त केली. मात्र त्यातच देबाशीष यांच्यासारखेही आहेत जे मृत्यूच्या दाढेतून परतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price : गणेश चतुर्थीआधी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, सोनेचांदीचा भाव लाखाच्या पार

Ganesh Chaturthi 2025 : गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत पाळा हे नियम; मिळेल भरपूर लाभ

Abhang Tukaram: टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर...; तुकाराम महाराजांची गाथा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Tourism: माथेरान, लोणावळाही पडेल फिकं; भंडारदऱ्यातील 'या' ७ जागांवर फिरून याच

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाला रसद पुरवणारा...; बीडच्या राड्यावर खासदार बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

SCROLL FOR NEXT