Kalicharan Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj : 'पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल'; कालीचरण महाराज असे का म्हणाले?

'पुढच्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Kalicharan Maharaj News : कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने अनेकदा नव्या वादाला तोंडही फुटतं. याच कालीचरण महाराजांनी आज, रविवारी अमरावतीत मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केलं. 'पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित भक्तांना संबोधित करताना कालीचरण यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केलं.

कालीचरण महाराज म्हणाले, ' हिंदूचं (Hindu) राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देशात १४० कोटी जनता आहे'. तर देशात ९४ कोटी हिंदू आहे, तर ४६ कोटी मुस्लिम आहे. पुढच्या दहा वर्षात देशात मुस्लीम पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल, असा दावा कालीचरण महाराज यांनी केला आहे.

'पूर्वीच्या काळात पाकिस्तानला भारत प्रतिउत्तर देत नव्हता. भारताला लगतचे सर्व देश पहिले भारताचे होते. मात्र ते आता सर्व हातून गेले आहे. देशातील पाच लाख मंदिर नष्ट केले. याला इतिहास साक्ष आहे, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले. कालीचरण महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केल्याने सामजिक वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यावर समाजातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT