Kalburgi CSMT Super Fast Train ,  saam tv
महाराष्ट्र

Kalaburagi - Mumbai CSMT Train : कलबुर्गीहून रविवारी मुंबईला विशेष ट्रेन; जाणून घ्या कारण

यामुळे प्रवाशांना फायदा हाेईल असेही रेल्वेनं स्पष्ट केले आहे.

विश्वभूषण लिमये

Central Railway News : प्रवाशांची (passengers) वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे (central railway) प्रशासनाने रविवारी (ता.१९ फेब्रुवारी) कलबुर्गी- सीएसएमटी सुपरफास्ट (kalaburgi csmt express) गाडी मुंबईला (mumbai) पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रविवारी ट्रेनची स्पेशल ट्रिप हाेणार आहे. (Maharashtra News)

कलबुर्गी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेस (Kalburgi CSMT Super Fast Train) ही कलबुर्गी स्थानकाहून १९ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता सुटणार आहे. तर या गाडीचे सोलापूर स्थानकावर नऊ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर कुर्डुवाडीला दहा वाजून दहा मिनिटांनी तर दौंडला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी आमगन होणार आहे.

त्यानंतर पुणे, लोणावळा (lonavala), पनवेल, ठाणे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) सकाळी सहा वाजता गाडी पाेहचेल. ही गाडी एकूण १८ कोचची आहे. यात गार्ड कम लगेजसाठी दोन कोच, संयनयान १५ तसेच पेट्री कार बंद राहणार आहे असे एकूण १८ डब्यांची ही गाडी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एका दिवसाची स्पेशल ट्रिप गाडी करणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये मान्सुन पुन्हा सक्रिय

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

VIRAL VIDEO: ३ लाख रूपयांत ट्रेनचा कोच बुक केला अन् केली पूजा; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Rain Alert : राज्यात २१ जुलैनंतर जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? वाचा

मिटिंगसाठी फ्लॅटवर नेलं अन् बलात्कार केला; युवा नेत्याचे धक्कादायक कृत्य, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT