fire in a house near yavatmal ayata village saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! सकाळच्या प्रहरी जयस्वाल कुटुंबाच्या संसाराची झाली राख रांगोळी

या घटनेत माय लेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात शाेककळा पसरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा आयता गावामध्ये आज (बुधवार) सकाळी आठ वाजता घरगुती गॅसने पेट घेतला असता. घरामध्ये गरोदर महिला (women) व पाच वर्षांची मुलगीच (girl) होती. घरामध्ये असलेल्या गरोदर महिला व पाच वर्षाची मुलगी यांचा आगीत जागीच होरपळून मृत्यू झाला. (yavatmal latest marathi news)

या घटनेत गरोदर महिला काजल विनोद जयस्वाल या मातेचा आणि त्यांची कन्या परी हिचा घरामध्येच होरपळून मृत्यू झाला. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली असताना गावातील लोकांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

fire in ayata village

तोपर्यंत विनोद जयस्वाल यांच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली होती. घरामध्ये संसार उपयोगी असलेली एकही साहित्य शिल्लक राहिलेले नव्हते. या आगीमुळे गावात भीतीचे वातावरण झाले होते. गावात ज्या कुटुंबाकडे गॅस आहे त्यांनी भीतीपाेटी सिलेंडर गावा बाहेर नेऊन ठेवले.

Edited By : Siddharth Latkar

fire in ayata village

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT