Ed Raid On Hasan Mushrif Home Saamtv
महाराष्ट्र

ED Raid: 'एकदाच आम्हाला गोळ्या घाला...' ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया; ६ तासांपासून चौकशी सुरू

गेल्या दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा ही धाड टाकली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा मारला. गेल्या दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा ही धाड टाकली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज ( ११ मार्च ) ईडीने पहाटे धाड टाकली. ईडीचे सात ते आठ अधिकारी पथकासह मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरी तब्बल सहा तास ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. आबिद हसन मुश्रीफ आणि सायरा हसन मुश्रीफ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू सुरू आहे.

हसन मुश्रीफ यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया..

ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, धाडीची माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर मोठी गर्दी केली आहे. यावेळी ईडी आणि किरिट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा मुश्रीफ यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT