अभिजीत सोनवणे
Pustakanch Hotel : आत्तापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचे मेन्यू पाहिले असतील. मात्र नाशिक जवळ असं एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला चमचमीत जेवणासोबतच चक्क पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध आहे. या हॉटेलची सध्या गावभर चर्चा सुरू आहे. (Latest Hotel News)
ओझर जवळच्या दहावा मैल परिसरात जोंधळे आजी या पुस्तकांचं हॉटेल चालवतात. रिलॅक्स कॉर्नर असं त्यांच्या हॉटेलचं नाव आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचन संस्कृती रुजावी यासाठी जोंधळे आजींनी आपल्या हॉटेलमध्ये रुचकर जेवणासोबतच पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. या हॉटेलमध्ये बसल्यावर एखाद्या लायब्ररी अथवा वाचनालयात बसल्याचा भास होतो. आपल्या हॉटेलमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने त्यांनी पुस्तकांची मांडणी केली आहे. एका बाजूला आसनव्यवस्था तर दुसऱ्या बाजूला पुस्तकांची मांडणी. मोबाईल बाजूला ठेवा आणि पुस्तक वाचायला घ्या, असं आजी आलेल्या प्रत्येकाला सांगतात.
मागील बारा वर्षांपासून आजी हे हॉटेल चालवत आहेत. तर तर मागील सात वर्षांपासून त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये पुस्तक ठेवण्यास सुरुवात केली. मेन्यूकार्डची संख्या कमी करून पुस्तकांच्या संख्येत वाढ केली. ऑर्डर येईपर्यंत ग्राहकाने पुस्तक वाचावं, यासाठी जेवणाच्या टेबलवर चक्क वेगवेगळी पुस्तक देखील ठेवली आहेत. पुस्तक चळवळ आणि वाचन संस्कृती वाढली पाहिजे हा या मागचा उद्देश.
चहाच्या टपरीपासून सुरू केला व्यवसाय
१९७२ च्या दुष्काळानंतर परिस्थिती फारशी नीट नसल्यामुळे जोंधळे आजींनी सुरुवातीला चहाची टपरी सुरू केली. आज या चहाच्या टपरीच रूपांतर पुस्तकाच्या हॉटेलमध्ये झालय. या परिसरात जोंधळे आजींच्या हातची पिठलं भाकरी खूपच फेमस आहे. त्यांच्या हातच्या नागलीच्या, बाजरीच्या भाकरी आणि झणझणीत पिठलं खवय्यांना फार आवडतं. या चमचमीत जेवणाच्या बरोबरीला असलेल्या पुस्तकांच्या मेजवानीचा देखील सर्वच जण अगदी मनापासून आस्वाद घेतांना पाहायला मिळतात. त्यामुळे आज अवघड जग मोबाईलच्या आहारी गेलेलं असताना ७२ वर्षांच्या जोंधळे आजींनी सुरू केलेली ही पुस्तकांची चळवळ निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.