Jitendra Awhad On Chhagan Bhujbal Saamtv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: 'ज्यांचं खाल्लं, प्यायलं त्यांच्याच नावाने…' शरद पवारांवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा भुजबळांवर हल्लाबोल

Jitendra Awhad On Chhagan Bhujbal: आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती.. असा घणाघात आव्हाडांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा झाली. शरद पवार यांच्यानंतर बीडमध्ये सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन अजित पवार गटाकडून करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेतून छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पवारांवरील टीकेनंतर सभेमध्ये चांगलाच गोंधळही पाहायला मिळाला. भुजबळांच्या या टीकेवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या (Beed) सभेत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे भाषण सुरू असताना उपस्थितांनी मोठा गोंधळ केल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांवरील (Sharad Pawar) टीकेनंतर हा सर्व गोंधळ सुरू झाल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकारावरुन आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड..

बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं... त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत... अशा तिखट शब्दात आव्हाडांनी भुजबळांवर टीका केली आहे.

रोहित पवारांचाही निशाणा...

"बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं... अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण ते टिटवाळा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड

Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

२००० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, पुण्यातील बड्या अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दणका; खुली चौकशी होणार, प्रशासनात खळबळ

Marathi artist Death: लोककलेचा ओजस्वी आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड

Farm Land: शेजारील शेतकरी वारंवार शेताचा बांध कोरत असेल तर? कायमचं टेन्शन कसं सोडवाल, काय आहे कायदा?

SCROLL FOR NEXT