Jitendra Awhad Oppose to Manusmriti in School Syllabus: saam
महाराष्ट्र

Jitendra Awhad: महाडमधील चवदार तळ्यावर आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन

Jitendra Awhad Oppose to Manusmriti in School Syllabus: अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये मनुस्मृतीचा समावेश केल्यामुळे विरोध केला जातोय. आज जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम, साम प्रतिनिधी

रायगड : शालेय अभ्यासक्रमात आराखड्यात मनुस्मृती, मनाचे श्लोक त्याचबरोबर भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आलेत. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध केलाय. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड याप्रकरणात आक्रमक झालेत. जितेंद्र आव्हाड यांनी आज महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून विरोध व्यक्त केला.

अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये मनुस्मृतीचा समावेश केल्यामुळे विरोध केला जात आहे. तिसरी ते बारावीची पाठ्यपुस्तक बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने सुधारित महाराष्ट्र राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केलाय. परंतु आरखडावरील आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत.

पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृती, मनाचे श्लोक व भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आलेत. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध केलाय. आमदार जितेंद्र आव्हाडांनी यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकार शिक्षणामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी याच्या विरोधात महाडमध्ये मनुस्मृती दहन करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मनुस्मृती लिहिलेल्या पत्रकं फाडत त्याचे दहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उष्माघाताने नागपूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू

Today Horoscope : कुणाच्या नशिबात पैसा, कुणाच्या भाग्यात नोकरी; वाचा आजचे १२ राशींचे भविष्य

Bell Fat Loss: रोज संध्याकाळी करा ही १ सोपी गोष्ट; सुटलेलं पोट कमी होऊन काही दिवसांत मिळेल सडपातळ शरीर

कांद्यानं कापला शेतकऱ्याचा खिसा; कांदा उत्पादकांचं हजारो कोटींचं नुकसान

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

SCROLL FOR NEXT