महाराष्ट्र

JItendra Avhad: 'मुलीच्या हत्येची धमकी आल्यावर एका बापाला काय वाटलं असेल?' जितेंद्र आव्हाडांची भावूक पोस्ट

JItendra Avhad: ठाण्यातील कालच्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Chandrakant Jagtap

JItendra Avhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी असलेला एक ऑडिओ काल व्हायरल झाला होता. यात आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारानंतर आव्हाड यांनी एका फेसबूक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ठाण्यातील कालच्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जावयाचा आणि मुलीच्या हत्येची धमकी मिळाल्यावर एका बापाला काय वाटलं असेल याचा राजकारण बाजूला ठेवून विचार करा असे भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

"आव्हाड यांनी फेसबूक पोस्क करून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. "ज्या नताशाला मी तिच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही किंवा ओरडलोही नाही. तिच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते.

तुम्हीच सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं कसं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं आणि भूमिका काय घ्यायची? घाबरुन घरी बसायचं का उघडपणाने मैदानात यायचं?

कोण आहे बाबाजी? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहीमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला. त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटलं असेल. राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखिल विचार करा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT